औरंगाबाद: तलाठी पदासाठी शहरात परीक्षा घेण्यात येत आहे. आज सकाळी हर्सूल परीक्षा केंद्रावर विद्यार्थी उशिरा आले. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही. विद्यार्थ्यांनी केंद्रावर गोंधळ घातला.
आज सकाळी साडे नऊच्या सुमारास हर्सूल येथील एका परीक्षा केंद्रावर तलाठी परीक्षेवेळी गोंधळ झाला. परीक्षेला ९:३० पर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आले. मात्र काही विद्यार्थी उशिरा आले. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यास नाकारले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.
यादरम्यान, हर्सूल पोलिसांनी विद्यार्थी किती वाजता आले याची शहानिशा करुन त्यांना समज देण्यात आली. मात्र परीक्षेला उशिरा आल्याने परीक्षेपासून विद्यार्थ्यांना मुकावे लागले.